राहुल गांधी यांना दिलासा, सूरत सत्र न्यायालयाकडून ‘या’ तारखेपर्यंत जामीन मंजूर
VIDEO | राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सूरत येथील न्यायालयाने सुनावली होती, 'या'प्रकरणी जामीनाला मुदतवाढ, कधी होणार पुढील सुनावणी ?
सूरत : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सूरत सत्र न्यायालयाकडून आज मोठा दिलासा मिळाला आहे. मोदी आडनावावरून केलेल्या वक्तव्यावर राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सूरत येथील कनिष्ठ न्यायालयाने सुनावली होती. राहुल गांधी यांनी याविरोधात आज सूरत सत्र न्यायालयात याचिका दाखल केली. त्यानंतर त्यांना जामीन मंजूर झाला आहे. त्यांच्या जामीनाला 10 दिवसांची मुदतवाढ मिळाली आहे. राहुल गांधी यांचा जामीन आणखी दहा दिवस म्हणजेच 13 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आला आहे. तर या प्रकरणाची सुनावणी 03 मे रोजी घेण्यात येणार आहे. 13 एप्रिल नंतर जामीनासंदर्भात काय निर्णय होतो, हे पाहणं महत्त्वाचं आहे. कनिष्ठ न्यायालयाचा निकाल सूरत सत्र न्यायालयात कायम राहिला तर राहुल गांधी यांना पुन्हा 2 वर्षांची शिक्षा कायम राहू शकते. त्यानंतर राहुल गांधी पुढील कोर्टात आव्हान देऊ शकतात.
Published on: Apr 03, 2023 07:52 PM
Latest Videos