Karad Property Video : सुरेश धसांनी कराडवर आरोप केलेला हाच ‘तो’ लातूरमधील 8 कोटींचा अलिशान बंगला, व्हिडीओ पाहून तुम्ही म्हणाल….
पुणे, सोलापूर, बीड जिल्ह्यात कोट्यवधींची संपत्ती ज्योती मंगल जाधवच्या नावाने असल्याचे उघड झाल्यानंतर आता लातूरमध्येही वाल्मिक कराडच्या दुसऱ्या पत्नीच्या नावाने आलिशान बंगला आणि कोट्यवधींची प्रॉपर्टी असल्याचा समोर आलं आहे.
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सूत्रधार असल्याचा आरोप होत असलेल्या वाल्मिक कराडवर दोन कोटी रुपयांची खंडणी मागण्यासह हत्याप्रकरणातही संबंध असल्याचा आरोप करण्यात येत आहे. दरम्यान, वाल्मिक कराडची दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधव हिच्या नावे साडे सतरा कोटी रुपयांची मालमत्ता आढळून आल्याने खळबळ उडाली होती. पुणे, सोलापूर, बीड जिल्ह्यात कोट्यवधींची संपत्ती ज्योती मंगल जाधवच्या नावाने असल्याचे उघड झाल्यानंतर आता लातूरमध्येही वाल्मिक कराडच्या दुसऱ्या पत्नीच्या नावाने आलिशान बंगला आणि कोट्यवधींची प्रॉपर्टी असल्याचा समोर आलं आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याचा लातूरमध्येही कोट्यवधींचा बंगला असल्याचे पाहायला मिळत आहे. वाल्मिक कराडचा लातूरमध्येही कोट्यवधींचा बंगला असल्याचा आरोप आमदार सुरेश धस यांनी केला होता, या अरोपांनंतर लातूरमध्ये या बंगल्याचा शोध घेण्यात आला, मात्र त्यावेळी हा बंगला एका महिलेच्या नावाने रजिस्टर असल्याचे समोर आले आहे. मुंबई, पुणे, सोलापूर, बीड आणि लातूर अशा अनेक शहरांमध्ये ज्या महिलेच्या नावाने प्रॉपर्टी आढळली आहे, त्याच महिलेच्या नावाने हा बंगला असल्याची माहिती मिळत आहे, सध्या याच आलिशान बंगल्याचे बांधकाम थांबविण्यात आले आहे.
![सरपंच हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त होणार? सरपंच हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त होणार?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/BEED-2.jpg?w=280&ar=16:9)
सरपंच हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त होणार?
![नाराजीच्या चर्चांनंतर भास्कर जाधव म्हणाले, 'पण ही वस्तुस्थिती...' नाराजीच्या चर्चांनंतर भास्कर जाधव म्हणाले, 'पण ही वस्तुस्थिती...'](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/bhaskar-jadhav-s.jpg?w=280&ar=16:9)
नाराजीच्या चर्चांनंतर भास्कर जाधव म्हणाले, 'पण ही वस्तुस्थिती...'
![मुंडेंविरोधात सुरेश धस पुन्हा आक्रमक, कृषी विभागाच्या सचिवाला थेट पत्र मुंडेंविरोधात सुरेश धस पुन्हा आक्रमक, कृषी विभागाच्या सचिवाला थेट पत्र](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/dhas-and-munde.jpg?w=280&ar=16:9)
मुंडेंविरोधात सुरेश धस पुन्हा आक्रमक, कृषी विभागाच्या सचिवाला थेट पत्र
![बापरे... भरधाव शिवशाही बसचं पुढचं टायर निघालं, 50 हून अधिक प्रवासी... बापरे... भरधाव शिवशाही बसचं पुढचं टायर निघालं, 50 हून अधिक प्रवासी...](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/shivshai.jpg?w=280&ar=16:9)
बापरे... भरधाव शिवशाही बसचं पुढचं टायर निघालं, 50 हून अधिक प्रवासी...
!['लाडकी बहीण'बाबत सरकारचा मोठा निर्णय, 'या' लाभार्थीना योजनेतून वगळणार 'लाडकी बहीण'बाबत सरकारचा मोठा निर्णय, 'या' लाभार्थीना योजनेतून वगळणार](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/ladki-bahin-yojana-pic.jpg?w=280&ar=16:9)