Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Suresh Dhas : 'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?

Suresh Dhas : ‘अजितदादा तुझ्या पाया पडतो…’, सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?

| Updated on: Jan 05, 2025 | 4:27 PM

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास सुरू असताना बीड, बुलढाणा, परभणीनंतर रविवारी पुणे शहरात मोर्चा काढण्यात आला.

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास सुरू असताना बीड, बुलढाणा, परभणीनंतर रविवारी पुणे शहरात मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी भाजप आमदार सुरेश धस यांनी मोर्च्यात सहभाग दर्शवत मुंडेंवर जोरदार निशाणा साधला. इतकंच नाहीतर अजित पवार यांच्यावरही भाष्य केलं. ‘वाल्मिक कराड आण्णा उर्फ आक्का 17 मोबाईल नंबर वापरतात. बीडच्या एसपी आणि सीआयडीच्या आयजींना विनंती आहे की नितीन कुलकर्णी आणि वाल्मिक कराड हे दोघे मिळून 17 मोबाईल नंबर वापरतात. हा नितीन कुलकर्णी वाल्मिक कराड आत गेल्यापासून गायब झाले आहे. त्यामुळे नितीन कुलकर्णी यांनी कोणाकडून किती माल घेतला, याचे सगळे पुरावे 17 मोबाईल मध्ये सापडतील’, असे म्हणत सुरेश धस यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय. पुढे ते असेही म्हणाले, देवेंद्र फडणवीसांना आणि अजित पवारांना विनंती करतो… अजित दादा फार प्रामाणिक माणूस आहे. पाच वर्षाच्या लेकरसारखं त्याचं हृदय आहे आणि तो कधीच चुकीच्या लोकांना मदत करणार नाही. राष्ट्रवादीत 2005 पासून 2015 पर्यंत राष्ट्रवादीत होतो. मी त्यांच्याबरोबर काम केलं अजित दादा असा नव्हता रे…अजित दादा तुझ्या पाया पडतो तुझं काय अडकलं रे यांच्यापाशी… असा सवालही धसांनी केला तर हे सातपुडा सरकारी बंगल्यावर जर बैठका घेत असतील आणि ही बैठक जर चुकीची निघाली मी चॅलेंज देतो राजकारण सोडून देईल, असं आव्हान देखील धसांनी दिलं.

Published on: Jan 05, 2025 04:27 PM