Suresh Dhas : ‘आकाचे आका तुम्हाला जेलवारी…’, सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
आकाच्या आका तुम्हाला जेलवारी करायला लागू शकते, असं वक्तव्य करत परभणीतील मोर्चातून सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधल्याचे पाहायला मिळाले. तर आका वाल्मिक कराडवर मोक्का लागला पाहिजे असं सुरेश धस यांनी म्हटले आहे. पुढचा नंबर आकाच्या आकाचा असू शकतो असेही सुरेश धस यांनी म्हटले आहे. ‘संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना मोक्का लागला पाहिजे. […]
आकाच्या आका तुम्हाला जेलवारी करायला लागू शकते, असं वक्तव्य करत परभणीतील मोर्चातून सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधल्याचे पाहायला मिळाले. तर आका वाल्मिक कराडवर मोक्का लागला पाहिजे असं सुरेश धस यांनी म्हटले आहे. पुढचा नंबर आकाच्या आकाचा असू शकतो असेही सुरेश धस यांनी म्हटले आहे. ‘संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना मोक्का लागला पाहिजे. त्यांना मोका लागला म्हणजे, चार पाच वर्ष ते काही बाहेर येत नाही. अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात घेतले. अजितदादा क्या हुँआ तेरा वादा…आकाच्या आकाला मंत्रिमंडळात का घेतले. बीड जिल्ह्यातील सर्व हत्या कोणी घडवून आणली. त्याचे रेकॉर्ड पाहा. हवे तर त्यासाठी बारामतीची माणसे पाठवा, चौकशी करा. आमच्या जिल्हा बिन मंत्र्यांच्या राहू द्या. त्यानंतर लोक आनंदी राहतील.’, असे आमदार सुरेश धस म्हणाले. बघा व्हिडीओ काय म्हणाले सुरेश धस?