बाळ्या मामा म्हात्रे यांच्या गोदामांवर एमएमआरडीएकडून कारवाईचा बडगा

बाळ्या मामा म्हात्रे यांच्या गोदामांवर एमएमआरडीएकडून कारवाईचा बडगा

| Updated on: Apr 05, 2024 | 6:21 PM

भिवंडी लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांची उमेदवारी गुरुवारी जाहीर करण्यात आली आहे. तर बाळ्या मामा म्हात्रे यांच्या गोदामांवर एमएमआरडीए कडून कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय.

बाळ्या मामा म्हात्रे यांच्या गोदामांवर एमएमआरडीए कडून कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय. भिवंडी लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांची उमेदवारी गुरुवारी जाहीर करण्यात आली आहे. येवई येथील आर के लॉजी पार्क येथील गोदाम बांधकामांवर एमएमआरडीएकडून ही कारवाई करण्यात आली. संपूर्ण तालुक्यातील गोदाम बांधकामांना संरक्षण देण्यासाठी शासनाने अध्यादेश काढले आहेत. त्यानुसार सर्व बांधकाम संरक्षित करण्यासाठी प्रस्ताव दाखल आणि उच्च न्यायालयातून स्थगिती आदेश घेतले आहेत, असे स्पष्टीकरण सुरेश म्हात्रे यांनी दिलेत. ते असेही म्हणाले, मी उभ्या केलेल्या गोदाम व्यवसायातून 90 हजार युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला. तालुक्यात अनधिकृत गोदाम व्यवसाय भ्रष्ट्राचाराची जननी कपिल पाटील हेच आहेत. एमएमआरडीए राजकीय दबावातून कारवाई करत आहेत. जिनके घर शिसेके होते है ओ दुसरे के घर पर पत्थर नहीं फेका करते, असे म्हणत सुरेश म्हात्रे यांनी भाजपा उमेदवार कपिल पाटील यांच्यावर पलटवार केलाय.

Published on: Apr 05, 2024 06:21 PM