Solapur ची लोकसभा कोण लढवणार? एकाच जागेवर काँग्रेस अन् राष्ट्रवादीनं ठोकला दावा
tv9 Special Report | सोलापुरातून प्रणिती शिंदे लोकसभेची निवडणूक लढवण्याची शक्यता? की राष्ट्रवादी आपला उमेदवार देणार? काँग्रेसच्या पराजयाची मालिका थांबणार? बघा टीव्ही ९ चा स्पेशल रिपोर्ट
मुंबई, १८ सप्टेंबर २०२३ | सोलापुरातून प्रणिती शिंदे लोकसभेची निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. खुद्द सुशीलकुमार शिंदे यांनी याचे संकेत दिले आहेत. सोलापूरच्या जागेवर याआधी राष्ट्रवादीनंही दावा ठोकला होता. त्यामुळं सोलापूरची जागा काँग्रेसच्या प्रणिती शिंदे लढवणार की राष्ट्रवादी आपला उमेदवार देणार अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. सोलापूरची लोकसभा कोण लढवणार हा प्रश्न महाविकास आघाडीच्या नेत्यांना सतावणार आहे. कारण सोलापूरच्या जागेवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनंही दावा ठोकलाय. सोलापूरच्या जागेसाठी काँग्रेसनं प्रणिती शिंदेंनाच उमेदवारी द्यावी अशी मागणी सुशीलकुमार शिंदेंनी केलीय. याआधी सोलापूरच्या जागेवर रोहित पवारांनी दावा केला होता, सोलापूरमध्ये भाकरी फिरवण्याची वेळ आलीय असं रोहित पवार म्हणाले होते, यावर प्रणिती शिंदेंनीही जळजळीत प्रतिक्रिया दिली होती, काय म्हणाले होते रोहित पवार? आणि यावर प्रणिती शिंदे यांची काय दिली होती प्रतिक्रिया? बघा व्हिडीओ…

टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले

गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार

सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..

निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
