Sushma Andhare : विदर्भातले दोन मोठे नेते विधानसभेत आमच्यासोबत…, सुषमा अंधारेंचा मोठा दावा
शिवसेना शिंदे गटाचे 6 आमदार शिवसेना ठाकरेंच्या संपर्कात असल्याच्या चर्चांवर सुषमा अंधारे विचारले असता कुणाला सोबत घ्यायचं किंवा कुणाला नाही घ्यायचं हा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतात. आमच्याकडे इन्कमिंग निश्चित सुरू होईल. सुषमा अंधारे यांनी काय केला मोठा दावा, बघा व्हिडीओ काय केला गौप्यस्फोट?
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सर्व आमदारांमध्ये एक अस्वस्थता असल्याचं समोर येत आहे. पण संपर्कात असणारी लोक नेमके कोणती आहेत ते माहिती नाही, असं वक्तव्य ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केलं. तर ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्यांमध्ये मराठवाड्यातल्या लोकांची शक्यता नाकारता येत नाही. कारण मराठवाड्यात तसं वातावरण असल्याचेही सुषमा अंधारे म्हणाल्या. दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे 6 आमदार शिवसेना ठाकरेंच्या संपर्कात असल्याच्या चर्चांवर सुषमा अंधारे विचारले असता कुणाला सोबत घ्यायचं किंवा कुणाला नाही घ्यायचं हा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतात. आमच्याकडे इन्कमिंग निश्चित सुरू होईल. विदर्भातले दोन मोठे नेते विधानसभेत आमच्या सोबत येणार आहेत, असा मोठा गौप्यस्फोट सुषमा अंधारे यांनी केला तर जे लोक ठरवून गेले, स्वतःच्या चुका लपवण्यासाठी पक्ष बदनाम केला अशा लोकांना घ्यायला शिवसैनिक देखील सकारात्मक नसल्याचे सुषमा अंधारे यांनी म्हटले.