Sushma Andhare Video : ‘हे ऑपरेशन टायगर नसून…’, राजन साळवींच्या शिवसेना प्रवेशावर सुषमा अंधारेंचा हल्लाबोल
उद्या उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार असल्याचे दिसतंय. कारण आजच राजन साळवींनी ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. राजन साळवी उद्या दुपारी तीन वाजता शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार?
उद्धव ठाकरे गटातील नेते राजन साळवी हे ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे. यावर सुषमा अंधारेंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘राजन साळवी ज्येष्ठ नेते असून कोकणात त्यांची मोठी ताकद आहे. गेल्या दोन अडीच वर्षांपासून राजन साळवींना त्रास होतोय. सातत्याने त्यांना एसीबीच्या धाडी आणि ईडीच्या नोटीसा असतील किंवा त्यांच्या पत्नीची थेट चौकशी करणं यासोबत त्यांच्या देवघरात जाऊन त्यांच्या देवाच्या मूर्त्या तपासणं आणि त्या किती किमतीच्या आहेत हे तपसाणं, हे अत्यंत गलिच्छ प्रकारचं आहे’, असं सुषमा अंधारे म्हणाल्या. तर भाजपची आणि शिंदे गटाची अशी गलिच्छ प्रवृत्ती झालीय. हे ऑपरेशन टायगर नसून हे ऑपरेशन ब्लॅकमेलर म्हणतात. हे असेच ब्लॅकमेलर लोक आहेत जे ब्लॅकमेल करतात, जे लोकं त्यांच्याकडे जातात त्यांना क्लिन चीट मिळते, असं म्हणत सुषमा अंधारे यांनी भाजपसह शिंदे गटावर सडकून टीकास्त्र डागलं. आता ते राजन साळवी यांच्या मागे लागते. पण गेले अडीच तीन वर्षे राजन साळवेंनी निखराचा लढा दिला. पण शेवटी कुटुंबाची प्राथमिकता महत्त्वाची असते. त्यामुळे राजन साळवी सध्या जो निर्णय घेतायत त्या परिस्थितीवर कोणतेही भाष्य मला करायचं नाहीये, असं म्हणत राजन साळवींच्या शिवसेनाप्रवेशावर सुषमा अंधारेंनी अधिक बोलणं टाळलं आहे. तर निश्चितपणे राजन साळवी एक चांगला माणूस आहे पण या लोकांच्या ब्लॅकमेलिंगला ते कंटाळले असल्याचेही अंधारे यांनी म्हटलं.