Sushma Andhare : 'कोण होतात तुम्ही, काय झालात तुम्ही... आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?

Sushma Andhare : ‘कोण होतात तुम्ही, काय झालात तुम्ही… आता भाजपची वाट’, सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?

| Updated on: Dec 19, 2024 | 5:14 PM

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या निमंत्रणाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच भाजप आणि शिवसेनेचे सर्व आमदार रेशीमबाग येथील स्मृती भवनात दाखल झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी शिवसेनेच्या विधानपरिषद आमदार-उपसभापती या नात्याने नीलम गोऱ्हेंनीही हजेरी लावली.

महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरु आहे. दरम्यान हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून महायुतीसाठी अर्थात रेशीमबागेत भाजप आणि मित्रपक्षांच्या आमदारांचे बौद्धिक घेतले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या निमंत्रणाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच भाजप आणि शिवसेनेचे सर्व आमदार रेशीमबाग येथील स्मृती भवनात दाखल झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी शिवसेनेच्या विधानपरिषद आमदार-उपसभापती या नात्याने नीलम गोऱ्हेंनीही हजेरी लावली. यावरून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाष्य करत नीलम गोऱ्हेंवर निशाणा साधला आहे. सुषमा अंधारे यांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर बोलताना असे म्हटले की, “संघ मुख्यालयात गेलेल्या नीलम गोरेंना जन्मभूमीत गेल्यासारखे वाटले म्हणे! अंगात कर्तृत्व नसेल आणि चापलुसीने काही मिळवण्याची धडपड असेल तर सत्ता माणसाला किती लाचार आणि प्रवाहपतीत करते याचे उत्तम उदाहरण नीलम गोरे आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या उपनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांचं विधान परिषदेच्या उपसभापती पद धोक्यात आल्यानंतर भाजपकडून काही मिळू शकतं का? यासाठी विचारांशी द्रोह करत आधी भारीप मग राष्ट्रवादी मग शिवसेना मग शिंदे गट आता भाजपची वाट” असे म्हणत सुषमा अंधारे यांनी खोचक टोला लगावला.

Published on: Dec 19, 2024 05:14 PM