Sushma Andhare यांचा ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी पुन्हा हल्लाबोल, आता कुणाच्या चौकशीची केली मागणी?
VIDEO | ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपी ललित पाटील पळाला की पळवला? ललित पाटील ड्रग्ज प्रकरणावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस का बोलत नाही? कोणत्या दुर्धर आजारामुळे ललित पाटीलवर ससूनमध्ये ९ गेल्या महिन्यांपासून उपचार सुरू होते? सुषमा अंधारे यांनी थेट केला सवाल
मुंबई, ११ ऑक्टोबर २०२३ | ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपी ललित पाटील पळाला की पळवला? असा सवाल सध्या उपस्थित केला जात आहे. ससूनमधून फरार झालेला आरोपी ज्या हॉटेलमध्ये पळाला त्या हॉटेलमधला सीसीटीव्ही समोर आला आहे. ज्या पोलिसाच्या हाताला झटका देऊन पळाला तो पोलिसही त्याच हॉटेलमध्ये गेल्याचे दिसत आहे. त्यामुळे संशय आणखी वाढला आहे. दरम्यान, या प्रकरणावरून सुषमा अंधारे यांनी सरकारवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. ललित पाटील ड्रग्ज प्रकरणावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस का बोलत नाही? असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला आहे. तर कोणत्या दुर्धर आजारामुळे ललित पाटीलवर ससूनमध्ये ९ गेल्या महिन्यांपासून उपचार सुरू होते. त्यामुळे आता जे ससूनचे डीन आहेत त्यांनी सांगावं ललितवर कोणत्या डॉक्टराने त्याच्यावर उपचार केलेत. ही बाब गंभीर असतानाही गृहमंत्री या प्रकरणावर का बोलत नाही, असे म्हणत ससूनच्या आजी माजी डीनची चैकशी करा म्हणत पुन्हा एकदा चौकशीची मागणी केली आहे.