‘आता आमचा भाऊ कपडे बदलल्यावाणी पक्ष बदलतो’; सुषमा अंधारे यांची राणे यांच्यावर खोचक टीका
आधी ठाकरे गटात असणारे आपल्याला, आता तिकडे गेले आहेत. ते मला म्हणायचे कशाला येतीस इकडे जायचं असेल तर तिकडे जा, ठाणेवाला खूप पावरफुल आहे. ठाण्यावाल्यांकडे गेलं तर काही तर राहील, मला वाटलं की नो ठाण्यावाला ना पुण्यावाला आपण जो काही विचार करू तो सत्याचा असला पाहिजे.
नांदेड : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी शिवसेना फूटीनंतर सुरू झालेल्या राजकारणावर भाष्य करताना आपल्याला शिंदे यांच्या गटात जाण्याबाबत अनेकांनी सांगितल्याचा उल्लेख केला. त्या नांदेड येथे बोलत होत्या. यावेळी त्यांनी, आधी ठाकरे गटात असणारे आपल्याला, आता तिकडे गेले आहेत. ते मला म्हणायचे कशाला येतीस इकडे जायचं असेल तर तिकडे जा, ठाणेवाला खूप पावरफुल आहे. ठाण्यावाल्यांकडे गेलं तर काही तर राहील, मला वाटलं की नो ठाण्यावाला ना पुण्यावाला आपण जो काही विचार करू तो सत्याचा असला पाहिजे. माझ्या बद्दल काय रिएक्सन येणार आहेत. त्यामध्ये पहिल्यांदा माझ्या उंचीवरून कुंचित पणा सुरू झाला. म्हणजे माझी उंची किती आहे. समीरच्या पोडीयमवर मी दिसते की नाही इथून सुरुवात झाली. आणि मी काळजीने बघत होते. बोलणारे कोण. तर कधी कंबोज बोलायचे तर कधी नितेश राणे, तर कधी निलेश राणे, मग मला वाटायचं कशाला या बारक्या बारक्या लेकरांच्या नादाला लागायचं, काय होते त्याने काय बिघडते, आपलेच भाच्चेच आहेत. आता आपल्या केंद्रीय मंत्री नारायण राणेंना वेळ मिळाला नाही त्यांना संस्कार देण्यासाठी, त्यात त्यांची काय चूक आहे. आता आमचा भाऊ कपडे बदलल्यावाणी पक्ष बदलतो त्याला कुठं आहे वेळ मिळतो अशी खोचक टीका सुषमा अंधारे यांनी केलीय.