Special Report | सुषमा अंधारे यांचं राज ठाकरे यांना खरमरीत पत्र, राज ठाकरे काय देणार उत्तर?
VIDEO | खारघर घटनेवरून सुषमा अंधारे यांचे राज ठाकरे यांना पत्र, राज ठाकरे पत्राला उत्तर देणार?
मुंबई : खारघर घटनेप्रकरणी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना खरमरीत पत्र लिहिलं आहे. दरम्यान, खारघरवरून राजकारण न करण्याचे आवाहन मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केले. झालेल्या घटनेला कुणाला जबाबदार धरणं योग्य नाही, असेही राज ठाकरे म्हणाले. राजकीय स्वार्थाशिवाय एवढी लोकं बोलवली जातात का, असा सवाल राज ठाकरे यांनी केला. पण, झालेली घटना हा अपघात आहे. अपघाताचं राजकारण करायचं नसतं, असं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलं. यावरून सुषमा अंधारे यांनी राज ठाकरे यांना पत्र लिहीलं. त्या पत्रात सुषमा अंधारे म्हणतात, आपण अत्यंत सिलेक्टिव्ह पद्धतीने व्यक्त झाला. त्यासंदर्भात काही प्रश्न उद्भवतात. कोरोना महामारी ही उद्धव ठाकरे निर्मित नाही तर निसर्गनिर्मित होती. हे आपल्याला ज्ञात असेलच. पण, खारघरमध्ये घडलेली दुर्घटना ही मानवनिर्मित आहे. कृपया याची नोंद घ्यावी. यासह त्यांनी थेट काही सवालही राज ठाकरे यांना विचारले. या पत्राला राज ठाकरे नेमकं आता काय उत्तर देणार याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.