Sushma Andhare on Sharad Pawar : शरद पवार यांच्याविषयी बोलताना सुषमा अंधारे भावूक
ठाकरे गटाच्या धडाडीच्या नेत्या सुषमा अंधारे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी बोलताना भावूक झाल्या. यावेळी सुषमा अंधारे यांनी पवारांना लिहिलेलं एक पत्र वाचून दाखवलं.
मुंबई : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे ( Sushma Andhare ) यांना शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्याबाबत एक किस्सा सांगताना अश्रृ अनावर झाले. सुषमा अंधारे म्हणाल्या की, मी माझे एम ए शिक्षण पूर्ण केल्यावर मला कंप्युटरचा डबा पाहायला मिळाला. आता तर पाचवीच्या मुलाला कंप्युटर मिळतं आहे. भटक्या जातीतील अनेक लोकं आहेत की जी संधी मिळाली की मोठी होतात. माझी अडचण होत होती की मी किती ही ओरडले तरी माझा आवाज जात नव्हता. उद्धव साहेबांचे मी आभार मानते की त्यांनी मला माझे मुद्दे मांडायला दिले. पवार साहेब यांच्या पुढे मी धाडसाने बोलते आहे. कारण आम्ही झोपड्यातील माणसं आहोत. आशल्याग भाषेत आमदार माझ्या बद्दल होतात आणि एकही पोलीस माझी तक्रार घेत नाहीत. विरोधी पक्षाने हा प्रश्न विचारायला पाहिजे होता.
सुषमा अंधारे भावूक
‘माझ्या बोलण्यात रग आहे. माझ्या जीवनात धग आहे. माझ्या बापापर्यंत जातात, साहेब हे तुमच्या समोर मांडले पाहिजे. कसदार पीक आहे आणि ते दमदारपणे आलं आहे.’ एका कार्यक्रमात बोलताना सुषमा अंधारे यांनी शरद पवार यांना लिहलेले पत्र वाचून दाखवलंं.
सुषमा अंधारे म्हणाल्या की, ‘काही नेत्यांनी माझे मेसेज ४,४ महिन्यांनी वाचले पण साहेब तुमच्या सहायकने पत्र मिळाले म्हणून कळवले. पत्र वाचून एका तासात तुम्ही मला फोन केला. बाई ही पायातली वाहन आहेत अशी भाषा सध्याची आमदार करतात. तुम्ही असायला हवं आणि कायम रहाव साहेब कारण मोट बांधणे गरजेचे आहे. साहेब, आपण एकत्र राहिलो तर मुजोरशाही निघून जाईल. एरवी कोणाची माफी मागत नाही आज काही चुकलं असेल तर सांभाळून घ्या.’