तुरुंगवास झाला तरीही माझी तयारी, सुषमा अंधारे यांची माघार नाहीच, काय आहे प्रकरण?
हक्कभंग प्रस्ताव प्रकरणी नीलम गोऱ्हे यांना सुषमा अंधारे यांनी हे पत्र लिहित तुरुंगवास पत्करेन पण मी माफी मागणार नाही असे म्हटले आहे. भाजप नेत्या देवयांनी फरांदे यांनी अंधारे यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडला आहे. अंधारे यांनी या प्रकरणी विधान परिषदेच्या सभापतींनी पत्र लिहिलं
पुणे, २३ डिसेंबर २०२३ : नीलम गोऱ्हे यांनी मागितलेल्या दिलगिरी पत्रावर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पत्राद्वारे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हक्कभंग प्रस्ताव प्रकरणी नीलम गोऱ्हे यांना सुषमा अंधारे यांनी हे पत्र लिहित तुरुंगवास पत्करेन पण मी माफी मागणार नाही असे म्हटले आहे. भाजप नेत्या देवयांनी फरांदे यांनी अंधारे यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडला आहे. अंधारे यांनी या प्रकरणी विधान परिषदेच्या सभापतींनी पत्र लिहिलं आहे. अंधारे यांनी संस्कृत भाषेत लिहिलेल्या या पत्रातून चूक मान्य केली आहे. पण चूक अनावधानाने झाल्याचं म्हटलं आहे भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी कोणतीही माहिती न घेता आरोप करणे चुकीचं असल्याचे म्हणत अंधारेंवर हक्कभंग आणण्याचा प्रस्ताव विधानपरिषदेत मांडला. या प्रस्तावावर नीलम गोऱ्हे यांनी सुषमा अंधारे यांना ८ दिवसात दिलगिरी व्यक्त करण्यास सांगितले होते. तर दिलगिरी व्यक्त करणारे पत्र न आल्यास प्रवीण दरेकर यांना मी हक्कभंग मांडण्यास परवानगी देईल असे नीलम गोऱ्हे म्हणाल्या होत्या.