मर्द आहात ना मग पाळा शब्द अन्..., आशिष शेलारांना महिला नेत्याचं ओपन चॅलेंज?

मर्द आहात ना मग पाळा शब्द अन्…, आशिष शेलारांना महिला नेत्याचं ओपन चॅलेंज?

| Updated on: Jun 07, 2024 | 4:56 PM

Sushma andhare On Ashish Shelar : आशिष शेलार शब्दाचे पक्के असतील तर त्यांनी आता राजीनामा दिला पाहिजे त्यांनी आता राजकीय संन्यास घेऊन पदावरून दूर व्हावे, आशिष शेलार यांनी संन्यास घ्यावा, असे म्हणत मर्द आहात ना मग शब्द पाळा...असं खुलं चॅलेंज ठाकरे गटाच्या महिला नेत्यानं दिलंय.

आशिष शेलार यांनी संन्यास घ्यावा, असे म्हणत मर्द आहात ना मग शब्द पाळा, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजप नेते आशिष शेलार यांना खुलं आव्हानच दिलं आहे. इतकंच नाहीतर तोंडवर करून इतरांना शहाणपणा सांगण्यापेक्षा आशिष शेलार खरंच शब्दाचे पक्के असतील तर त्यांना राजीनामा द्यावा, अशी थेट मागणीच सुषमा अंधारे यांनी केली आहे. पुढे त्या असेही म्हणाल्या की, शेलार शब्दाचे पक्के असतील तर त्यांनी आता राजीनामा दिला पाहिजे त्यांनी आता राजकीय संन्यास घेऊन पदावरून दूर व्हावे, असा खोचक सल्लाच सुषमा अंधारे यांनी आशिष शेलार यांना दिला आहे. ‘उद्धव ठाकरे तुम्ही जर मर्दाचा पक्ष चालवत असाल आणि त्यांचं तुम्ही नेतृत्व करत असाल तर माझं तुम्हाला जाहीर आव्हान आहे, भाजप देशात ५४ वर गेली तर उद्धव ठाकरे तुम्ही राजकारण सोडाल आणि मी तुम्हाला प्रतिआव्हान देतो, देशात जाऊद्या पण राज्यात मविआच्या १८ जागा आल्या तर मी राजकारण सोडेल’, असं वक्तव्य आशिष शेलार यांनी केलं होते. यावरून अंधारेंनी शेलारांवर पलटवार केलाय.

Published on: Jun 07, 2024 04:56 PM