'हे' तर दुसऱ्याच्या लग्नात बुंदी वाटण्यासारखं; सुषमा अंधारे यांची शिंदेगटावर टीका

‘हे’ तर दुसऱ्याच्या लग्नात बुंदी वाटण्यासारखं; सुषमा अंधारे यांची शिंदेगटावर टीका

| Updated on: Feb 18, 2023 | 1:53 PM

निवडणूक आयोगाचा निर्णय आणि शिंदेगटाचं सेलिब्रेशन यावरून ठाकरेगटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी टीका केली आहे. त्या काय म्हणाल्या आहेत? पाहा...

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह आता शिंदेगटाला अधिकृतपणे वापरता येणार आहे. निवडणूक आयोगाने यासंदर्भात महत्वाचा निर्णय दिलाय. हा निर्णय आल्यानंतर शिंदेगटाने जोरदार सेलिब्रेशन केलं. निवडणूक आयोगाचा निर्णय आणि शिंदेगटाचं सेलिब्रेशन यावरून ठाकरेगटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी टीका केली आहे. शिंदेगटाचं कालचं सेलिब्रेशन म्हणजे दुसऱ्याच्या लग्नात बुंदी वाटण्यासारखं होतं, असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत. एकनाथ शिंदे यांच्या राजकीय अस्तित्वावर देवेंद्र फडणवीस यांनी काल शेवटचा घाव घातलेला आहे, असंही अंधारे म्हणाल्या आहेत.

Published on: Feb 18, 2023 01:53 PM