राणेंना अटक होणार? धमकीची भाषा अन् अरेरावी भोवणार? ठाकरेंची शिवसेना आक्रमक; बघा मागणी काय?
मालवण किल्ल्यावर राडा झाल्यानंतर दोन्ही पक्षांच्या 42 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झालेत. तर महाराजांचा पुतळा तयार करणारा शिल्पकार जयदीप आपटे आणि कंत्राटदार अजूनही फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरु आहे. त्यावरुन सुषमा अंधारेंनी नितेश राणेंसोबतचे फोटो दाखवून सवाल केलेत.
मालवणच्या राजकोट किल्ल्यावर काल राजकीय राडा झाला. त्यानंतर पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेनं आंदोलन करत राणेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आणि राणेंची धमकीची भाषा आणि अरेरावीवरुन राणेंना अटक करा अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेनं केली. मालवणमध्ये राजकोट किल्ल्यात राजकीय राड्या दरम्यान नारायण राणेंनी थेट धमकी दिल्याचे पाहायला मिळाले. निलेश राणेंनी पोलिसांशी केलेल्या अरेरावी वरुन पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंनी आंदोलन केलं. चार आणे, बारा आणे, अटक करा नारायण राणे अशा घोषणा ठाकरेंच्या शिवसेनेनं दिल्याचे पाहायला मिळाले. मालवणच्या राजकोट किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर, पाहणीसाठी बुधवारी राणे आणि आदित्य ठाकरे दोघेही एकाचवेळी दाखल झाले आणि राडा झाला. राणे आणि ठाकरेंचे समर्थक भिडले. राणे पिता पुत्रांची भाषाही कॅमेऱ्यात कैद झाली. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट