'मी धमक्यांना भीक घालत नाही, तर..', शंभूराज देसाईंच्या 'त्या' नोटीसीला सुषमा अंधारेंचं उत्तर

‘मी धमक्यांना भीक घालत नाही, तर..’, शंभूराज देसाईंच्या ‘त्या’ नोटीसीला सुषमा अंधारेंचं उत्तर

| Updated on: May 31, 2024 | 12:23 PM

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी उत्पादन शुल्क विभागावर केलेले आरोप खोटे असल्याचे म्हणत त्यांनी सुषमा अंधारे यांच्यासह रवींद्र धंगेकर यांना अब्रुनुकसानीची नोटीस पाठवली होती. दरम्यान, या नोटीवर सुषमा अंधारे यांनी उत्तर दिलं आहे. बघा काय दिलं अब्रुनुकसानीच्या नोटीसीवर उत्तर?

पुण्यातले बेकायदेशीर पब आणि बार विरोधात पुण्यात केलेल्या आंदोलनानंतर राज्य शुल्क विभागाचे मंत्री शंभुराज देसाई यांनी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर आणि ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी उत्पादन शुल्क विभागावर केलेले आरोप खोटे असल्याचे म्हणत त्यांनी सुषमा अंधारे यांच्यासह रवींद्र धंगेकर यांना अब्रुनुकसानीची नोटीस पाठवली होती. दरम्यान, या नोटीवर सुषमा अंधारे यांनी उत्तर दिलं आहे. मी कुठल्याही धमक्यांना भीक घालत नाही, माझी लढाई चालूच ठेवणार असल्याचे म्हणत सुषमा अंधारे यांनी शंभूराज देसाई यांनी पाठवलेल्या नोटीसीवर प्रतिक्रिया दिली आहे. पुढे अंधारे असेही म्हणाले, ‘गुटखा, सिगारेट यावर बंदी घालण्याचे काम केलं पाहिजे तर शंभूराज देसाई स्वतःच सभागृहा तंबाखू चोळत असतात आणि त्यांच्या वर्मावर बोट ठेवलं तर मी तुमच्या अब्रुनुकसानीचा दावा टाकेल, अशा धमक्या देत आवाज बंद करत असतात.’

Published on: May 31, 2024 12:23 PM