Special Report | बीडमधील ‘भीड’वरून ठाकरे-भाजप समर्थक भिडले, महाप्रबोधन यात्रेत किती गर्दी होती?
VIDEO | महाप्रबोधन यात्रेत खरोखर किती गर्दी होती? बीडमधील सभेतील गर्दीवरून ठाकरे-भाजप समर्थकांमध्ये तू-तू मैं-मैं
मुंबई : बीडमध्ये झालेल्या ठाकरे गटाच्या महाप्रबोधन सभेत जमलेल्या गर्दीवरून ठाकरे-भाजप समर्थकांनी वेगवेगळे दावे केलेत. या सभेत रिकाम्या खुर्च्या असल्याचा फोटो भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्विट केला. यासह शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनीही यासंदर्भात ट्विट करत टीका केली. तेव्हापासून महाप्रबोधन सभेत खरोखर गर्दी होती की नाही याची चर्चा सुरू झाल्याचे पाहायला मिळाले. नितेश राणे यांनी शकुनीमामाचा बीडमध्ये फ्लॉप शो.. महाप्रबोधन म्हणे…असे म्हणत रिकाम्या खुर्च्याचे फोटो शेअर केले. तर महाप्रबोधन सभा बीड, प्रचंड गर्दीला शुभेच्छा…असे लिहीत उदय सामंत यांनी ठाकरे गटाला डिवचल्याचे पाहायला मिळाले. मात्र राणे आणि सामंत यांच्या ट्विटवर ठाकरे गटाचे कार्यकर्ते तुटून पडलेत. ठाकरे गटाच्या समर्थकांनी गर्दीचे फोटो टाकणं सुरू केले. जे व्हिडीओ ठाकरे गटाच्या समर्थकांनी टाकले त्यात प्रचंड गर्दी होती आणि माध्यमांच्या कॅमेऱ्याने जे टिपलं यावरू महाप्रबोधन यात्रेला गर्दी असल्याचे दिसून आलं. त्यामुळे दुसऱ्या दिवशी नितेश राणे यांनी या रिकाम्या खुर्च्यावर न बोलता वेगळी भूमिका मांडली. राणे म्हणाले, सभेला आधी गर्दी नव्हती नतंर राष्ट्रवादीच्या लोकांना फोन करून गर्दी जमवली गेली.