Sushma Andhare : सुषमा अंधारे आज शिवसेनेत प्रवेश करणार, शिवसेनेला मिळणार आंबेडकरी चळवळीचा चेहरा
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात केलेली भाषणे पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत. या भाषणांमध्ये सुषमा अंधारे यांनी जाहीर सभांमध्ये उद्धव ठाकरेंवर अत्यंत गंभीर टीका केल्या आहेत.
मुंबई : आज सुषमा अंधारे यांच्या माध्यमातून शिवसेनेला आंबेडकरी चळवळीतला नवा चेहरा मिळणार आहे. फुले-आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्या आणि प्रसिद्ध वक्त्या प्रा. सुषमा अंधारे(Sushma Andhare) या शिवसेनेत(Shiv Sena) जाहीर प्रवेश करणार आहेत. शिवसेना-भाजप युती तुटल्यानंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवले(ramdas athawale) भाजप सोबत गेले. मात्र, आता पुन्हा एकदा सुषमाताई अंधारे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे शिक शक्ती – भिम शक्ती असा नारा ऐकायला मिळणार आहे. सुषमा अंधारे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या घोषणेनंतर त्यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरें(Uddhav Thackeray ) विरोधात केलेली भाषणे पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत. या भाषणांमध्ये सुषमा अंधारे यांनी जाहीर सभांमध्ये उद्धव ठाकरेंवर अत्यंत गंभीर टीका केल्या आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादीच्या प्रचार सभांमध्ये सुषमा अंधारे यांनी उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंवरही सातत्याने निशाणा साधला होता.