‘नार्वेकरांनी उद्दामपणे तसे म्हणणे वाईट, पण आता…’; ठाकरे गटाचा नार्वेकर यांच्यावर निशाना
सत्तासंघर्षाच्या सुनावतीन सध्याच्या शिंदे-फडणवीस सरकारला नवे जीवदान उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यामुळे मिळाले. पण त्या १६ आमदारांवर अपात्रतेची ठांगती तलवार आजही आहे.
नांदेड : राज्यातील सत्ता संघर्षात कळीचा मुद्दा हा १६ आमदारांच्या अपात्रतेचा ठरला आहे. सत्तासंघर्षाच्या सुनावतीन सध्याच्या शिंदे-फडणवीस सरकारला नवे जीवदान उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यामुळे मिळाले. पण त्या १६ आमदारांवर अपात्रतेची ठांगती तलवार आजही आहे. यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय न घेतल्याने सर्वोच्च न्यायालयाने विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना नोटीस बजावली आहे. नोटीस बजावून सभापतींना लवकरच निर्णय घेण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत. यावरून सध्या राज्याच्या राजकारण खळबळ उडालेली असतानाच ठाकरे गटाकडून आता टीका होत आहे. यावरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या की, राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची स्थगिती उठली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आता अजित पवार यांची तिकडे एन्ट्री झाली आणि 16 आमदारांच्या निलंबनाबद्दल चर्चा सुरू झाली. इतके दिवस मिलिंद नार्वेकर असे सांगत होते की, मला कोणीही सांगू शकत नाही. मी वाटेल त्या वेळेला निर्णय घेईल. आम्ही तेव्हा सांगत होतो की, निर्णयाला किती वेळ लागेल हे स्पष्ट सांगितलेलं आहे. के. ई. शामचंद्र मेघसिंह विरुद्ध मणिपूर राज्य खटल्यात तीन महिन्याच्या आत निर्णय घ्यावा असे म्हटलेले असताना सुद्धा नार्वेकरांनी उद्दामपणे तसे म्हणणे वाईट होते. परंतु किमान या निमित्ताने सुप्रीम कोर्टाने दोन आठवड्याचा निर्णय दिला. आता नार्वेकर काय निर्णय घेतील हा तसा संशोधनाचा विषय आहे, असे त्या म्हणाल्या.