Video | 12 आमदारांच्या निलंबनाविरोधात भाजपची सर्वोच्च न्यायालयात धाव
भाजपच्या निलंबित आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात 4 याचिका दाखल केल्या आहेत. तशी माहिती भाजप आमदार आशिष शेलार यांनी दिलीय.
मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भाजप आमदारांनी मोठा गोंधळ घातला होता. विधानसभा अध्यक्षांच्या दालनात तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की झाल्याचा आरोप भाजप आमदारांवर करण्यात आला. त्यानंतर भाजपच्या 12 आमदारांवर 1 वर्षाच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. निलंबनाच्या या कारवाईविरोधात भाजपच्या 12 आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. भाजपच्या निलंबित आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात 4 याचिका दाखल केल्या आहेत. तशी माहिती भाजप आमदार आशिष शेलार यांनी दिलीय.
Published on: Jul 22, 2021 07:35 PM
Latest Videos