साताऱ्यात उदयनराजे भोसलेंच्या तिकीटावरून सस्पेन्स कायम, समर्थक भाजपविरोधात आक्रमक
साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी न दिल्यास उदयनराजे भोसले यांचे समर्थक भाजपाचा राजीनामा देणार? महायुतीत भाजपची जागा भाजपच लढवणार की मग यंदा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला दिली जाणार?
मुंबई, १६ मार्च २०२४ : साताऱ्यात अजूनही भाजपनं उदयनराजे भोसले यांची उमेदवारी का जाहीर केली नाही, म्हणून उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांनी भाजपला थेट इशारा दिलाय. साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी न दिल्यास उदयनराजे भोसले यांचे समर्थक भाजपाचा राजीनामा देणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार, महायुतीत भाजपची जागा भाजपच लढवणार की मग यंदा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला दिली जाणार? याबद्दल अद्याप पेच आहे. पण जागा भाजपची आहे तर मग दिरंगाई का… असा सवाल करत उदयनराजे भोसले यांचे समर्थक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत. साताऱ्यातून लोकसभेसाठी मविआकडून श्रीनिवास पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्यासह पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव चर्चेत आहेत. तर भाजपकडून उदयनराजे भोसले यांच्यासह अतुल भोसले यांचंही नाव घेतलं जातंय. बघा कुणाच्या नावावर होणार शिक्कामोर्तब?