उदयनराजे भोसले दिल्लीत पण वाद महाराष्ट्रात... साताऱ्यातील उमेदवारीवरून सस्पेन्स कायम?

उदयनराजे भोसले दिल्लीत पण वाद महाराष्ट्रात… साताऱ्यातील उमेदवारीवरून सस्पेन्स कायम?

| Updated on: Mar 24, 2024 | 12:24 PM

महाविकास आघाडीकडून कोल्हापुरात शाहू महाराज छत्रपती यांचं नाव निश्चित झालंय. तर दुसरीकडे महायुतीकडून साताऱ्यातील लोकसभा निवडणुकीसाठी उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीवरून अद्याप सस्पेन्स कायम आहे.

तीन दिवसांपासून उदयनराजे भोसले दिल्लीमध्ये आहे. यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपवर निशाणा साधत टीका केली. महाविकास आघाडीकडून कोल्हापुरात शाहू महाराज छत्रपती यांचं नाव निश्चित झालंय. तर दुसरीकडे महायुतीकडून साताऱ्यातील लोकसभा निवडणुकीसाठी उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीवरून अद्याप सस्पेन्स कायम आहे. एकीकडे तीन पक्ष कोल्हापुरच्या राजेंना उमेदवारीचा आग्रह करताय. तर साताऱ्यातील उदयनराजे भोसले यांना उमेदवारीकरता दिल्लीत तीन दिवस मुक्काम करावा लागतोय, असं म्हणत ठाकरेंच्या शिवसेना युवासेनेकडून भाजपवर टीका होतेय. दरम्यान, उदयनराजे भोसले हे लोकसभेच्या तिकीटासाठी दिल्लीत आहे. विशेष म्हणजे विरोधकच नव्हे तर भाजपचे नरेंद्र पाटील सुद्धा याबाबत खंत व्यक्त करताय. गेल्या 2019 च्या लोकसभा निवडणुकीत साताऱ्यात भाजप विरूद्ध राष्ट्रवादीत सामना झाला होता. मात्र यंदा अजित पवारांच्या रूपाने राष्ट्रवादीचा एक गट भाजपसोबत आहे. दरम्यान, दादांच्या राष्ट्रवादीकडून आमदार मकरंद पाटलांचे बंधू नितीन पाटील यांचं नाव चर्चेत आहे. मात्र गेल्यावेळी सातराची ही जागा भाजपने लढवल्याने उदयनराजे यांचे समर्थक आग्रही आहेत. बघा स्पेशल रिपोर्ट

Published on: Mar 24, 2024 12:24 PM