शेतकरी मेळाव्यात शेतकऱ्यांबद्दल बोलायचे नाही ही फॅशन, राजू शेट्टी यांनी कुणावर साधला निशाणा?
VIDEO | सहकार मंत्री असून सहकारसाठी काय केलं? अमित शाह यांना राजू शेट्टी यांचा थेट सवाल
सोलापूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे कोल्हापूर दौऱ्यावर असताना त्यावेळी त्यांनी सहकार परिषद घेतली यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कोणतेही भाष्य केले नाही. यासंदर्भात प्रतिक्रिया देताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेटे नेते राजू शेट्टी म्हणाले, शेतकरी मेळाव्यात शेतकऱ्यांबद्दल बोलायचे नाही तर सहकारी मेळाव्यात सहकार बद्दल बोलायचे नाही ही फॅशन झाली आहे. आता फक्त नावालाच सहकार परिषद, शेतकरी मेळावे राहिले त्यात शेतकरी किंवा सहकार कुठेच नसतो, अशी खंतही राजू शेट्टी यांनी व्यक्त केली. अमित शहा हे सहकार मंत्री होऊन 1 वर्ष झाले मात्र त्यांनी सहकारासाठी काय केले हे त्यांनी सांगावे, असा सवाल राजू शेट्टी यांनी उपस्थित केला आहे.
Published on: Feb 21, 2023 04:56 PM
Latest Videos