२०२४ ला ‘स्वराज्य’ येणार, ती वेळ आली, छत्रपती संभाजीराजे यांचा इशारा कुणाला ?
संभाजी राजे यांचा खरा इतिहास सर्वांसमोर आणा. त्याबाबत कोणताही वाद होणार नाही याची काळजी घ्यावी. स्वराज्यरक्षक की धर्मवीर काहीही म्हणा पण इतिहास काय म्हणतो ते लिहा. त्यांची खरी उपाधी काय आहे ते लिहा.
औरंगाबाद : छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाचा आराखडा सरकार तयार करत आहे. पण हे स्मारक होताना संभाजी राजे यांचा खरा इतिहास सर्वांसमोर आणा. त्याबाबत कोणताही वाद होणार नाही याची काळजी घ्यावी. स्वराज्यरक्षक की धर्मवीर काहीही म्हणा पण इतिहास काय म्हणतो ते लिहा. त्यांची खरी उपाधी काय आहे ते लिहा. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर त्यांनी स्वराज्य कसे सांभाळले याची माहिती व्हावी. सरकारला काही सूचना केलेल्या नाहीत. पण, ती करण्याची आता वेळ आली आहे, असा इशारा छत्रपती संभाजीराजे यांनी दिला आहे. माझी स्वराज्य ही संघटना स्वतंत्र आहे. आमच्या समविचारी पक्षांना सोबत घेऊन आम्ही वाटचाल करणार आहोत. २०२४ ला स्वराज्य राज्याच्या राजकारणात उतरणार आहे, अशी घोषणा त्यांनी केली.