T20 World Cup 2024 : इंडिया टीममधील ‘या’ प्लेअर्सना थेट मोदींचा फोन, नेमकं काय म्हणाले?
टीम इंडियाचा विजय हा संपूर्ण देशाला अभिमानास्पद वाटत असल्याने सर्वत्र जल्लोषाचे वातावरण आहे. T20 विश्वचषक जिंकल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वविजेत्या भारतीय संघाचे अभिनंदन केले. इतकंच नाहीतर भारतीय संघातील सहा जणांचे पंतप्रधान मोदींनी विशेष आभारही मानले.
भारतीय संघाच्या T20 वर्ल्ड कप विजयाने संपूर्ण देश जल्लोष आणि आनंद व्यक्त करत आहे. टीम इंडियाचा विजय हा संपूर्ण देशाला अभिमानास्पद वाटत असल्याने सर्वत्र जल्लोषाचे वातावरण आहे. T20 विश्वचषक जिंकल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वविजेत्या भारतीय संघाचे अभिनंदन केले. इतकंच नाहीतर भारतीय संघातील सहा जणांचे पंतप्रधान मोदींनी विशेष आभारही मानले. यावेळी पंतप्रधान मोदींनी कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह आणि कोच राहुल द्रविड यांना फोन करून विश्वचषकाच्या विजयासाठी शुभेच्छा दिल्या. दरम्यान, भारतीय क्रिकेटमधील योगदानासाठी रोहित शर्माला शानदार कॅप्टनशिपसाठी मोदींनी शुभेच्छा दिल्यात. तर विराट कोहलीच्या दमदार कामगिरीचे आणि भारतीय क्रिकेटमधील योगदानासाठी मोदींनी त्यांच कौतुक केलं. भारतीय क्रिकेटमधील योगदानासाठी मोदींनी राहुल द्रविडचेही आभार मानले. भारताच्या विजयानंतर मोदींनी काही क्षणातच ट्वीट करुन भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या.