T20 World Cup 2024 : वर्ल्डकप जिंकून मायदेशी रोहित शर्माला पाहून वर्ल्ड चॅम्पियनची आई भावूक, म्हणाली…
गुरूवारी 4 जुलैला टीम इंडिया भारतात परतला. प्रथम दिल्लीत आणि नंतर मुंबईत लाखो चाहत्यांनी टीम इंडियाच्या शिलेदारांचं जोरदार स्वागत केले. मोठ्या यशानंतर आपल्या मुलाच्या भेटीसाठी रोहित शर्माची आई आतुर झाली होती. जेव्हा रोहितच्या आईने त्याला पाहिले तेव्हा तिने थेट गळाभेट घेतली आणि गोडपापा दिला.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया 29 जून रोजी बार्बाडोसमध्ये वर्ल्ड चॅम्पियन बनली. तेव्हापासूनच संपूर्ण देश सर्व खेळाडूंची मायदेशी परण्याची वाट पाहत होता, मात्र वादळामुळे सर्व खेळाडू तेथेच अडकले होते. मात्र गुरूवारी 4 जुलैला टीम इंडिया भारतात परतला. प्रथम दिल्लीत आणि नंतर मुंबईत लाखो चाहत्यांनी टीम इंडियाच्या शिलेदारांचं जोरदार स्वागत केले. रोहित शर्मा आपल्या संघासह विश्वविजेता बनण्यासाठी एका महिन्याहून अधिक काळ देशाबाहेरच नाही तर आपल्या आई-वडिलांपासून दूर राहिला होता. मात्र या मोठ्या यशानंतर आपल्या मुलाच्या भेटीसाठी रोहित शर्माची आई आतुर झाली होती. जेव्हा रोहितच्या आईने त्याला पाहिले तेव्हा तिने थेट गळाभेट घेतली आणि गोडपापा दिला. तर माझं आणि माझ्या मुलाचं स्वप्न पूर्ण झालं असं वर्ल्ड चॅम्पियन रोहित शर्मा याची आई पौर्णिमा शर्मा यांनी म्हटलंय. इतकंच नाहीतर मुलाने देशाचं नाव मोठं केलं त्यामुळे मला त्याचा अभिमान वाटतो, असंही रोहित शर्माच्या आईने आपल्या भावना व्यक्त केल्यात.