T20 World Cup 2024 : आतापर्यंत वर्ल्डकपवर आपलं नाव कोरणारे ‘हे’ प्रतिभावंत भारतीय कॅप्टन्स
टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला 169 धावांवर रोखण्यात यश मिळवलं. टीम इंडियाने यासह रोहित शर्माच्या नेतृत्वात टी 20 वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरलं. रोहित शर्माची कॅप्टन म्हणून पहिली आणि खेळाडू म्हणून दुसरी टी 20 वर्ल्ड कप ट्रॉफी ठरली. दरम्यान, आतापर्यंत विश्वचषक जिंकणारे भारतीय कर्णधार कोण? तुम्हाला माहिती आहे का?
भारताने विश्वचषकाच्या फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून दुसऱ्यांदा ट्रॉफी जिंकली आहे. 2023 च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या दारूण पराभवानंतर सर्वांचेच मन दुखले होते. पण बरोबर एक वर्षानंतर भारताने विश्वचषक जिंकला आणि करोडो देशवासीयांच्या चेहऱ्यावर हसू उमटले. इतकेच नाहीतर प्रत्येक भारतीयांची मान अभिमानानं उंचावली आहे. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला 169 धावांवर रोखण्यात यश मिळवलं. टीम इंडियाने यासह रोहित शर्माच्या नेतृत्वात टी 20 वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरलं. रोहित शर्माची कॅप्टन म्हणून पहिली आणि खेळाडू म्हणून दुसरी टी 20 वर्ल्ड कप ट्रॉफी ठरली. दरम्यान, आतापर्यंत विश्वचषक जिंकणारे भारतीय कर्णधार कोण? तुम्हाला माहिती आहे का? 1983 साली कपिल देव यांनी भारतीय संघाला विश्वचषक जिंकून दिला होता. महेंद्र सिंह धोनी याने 2007 आणि 2011 साली भारतीय संघाला विश्वचषक मिळवून दिला. तर 2024 साली रोहित शर्मा याने भारतीय संघाला विश्वचषक जिंकून देणार भारतीय कर्णधार ठरला.