Zakir Hussain passes Away : प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोमधील रूग्णालयात झाकीर हुसेन यांनी अखेरचा श्वास घेतला. उस्ताद झाकीर हुसेन गेल्या काही वर्षांपासून हृदयविकाराच्या आजाराचा सामना करत होते. गेल्या आठवड्यातही त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रूग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं काल, रविवारी निधन झालं आहे. झाकीर हुसेन यांच्यावर अमेरिकेत उपचार सुरू होते. ते ७३ वर्षांचे होते. अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोमधील रूग्णालयात झाकीर हुसेन यांनी अखेरचा श्वास घेतला. उस्ताद झाकीर हुसेन गेल्या काही वर्षांपासून हृदयविकाराच्या आजाराचा सामना करत होते. गेल्या आठवड्यातही त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रूग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र पुन्हा जास्त प्रकृती बिघडल्याचे लक्षात येता त्यांना अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोमधील रूग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्याने कला विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. संगीत विश्वातील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी त्यांना २००२ मध्ये पद्म आणि २०२३ मध्ये पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. तर उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म ९ मार्चा १९५१ रोजी मुंबईत झाला होता. त्यांचे वडील उस्ताद अल्लारखा हे देखील प्रसिद्ध तबला वादक होते. झाकीर हुसेन यांनी आपले वडील अल्लारखा यांच्या कलेचा वारसा जपत संगीत क्षेत्रातच करिअर करण्याचे ठरवले विशेष म्हणजे त्यांचे पहिले गुरू त्यांचे वडीलच होते.