VIDEO : Nagpur | नारायण राणे यांच्या वक्तव्याविरोधात कारवाई करा : किशोर कन्हेरे
नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा चिपळूणमध्ये सुरु झाल्यानंतर भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमने सामने आले. नाशिक, मुंबई, पुणे, सांगली, ठाणे पाठोपाठ नागपूरमध्ये देखील शिवसैनिक आक्रमक झालेले पाहायला मिळाले.
नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा चिपळूणमध्ये सुरु झाल्यानंतर भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमने सामने आले. नाशिक, मुंबई, पुणे, सांगली, ठाणे पाठोपाठ नागपूरमध्ये देखील शिवसैनिक आक्रमक झालेले पाहायला मिळाले. नागपूरच्या धंतोली येथील भाजपच्या विभागीय कार्यालयाबाहेर शिवसेना कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. नारायण राणे यांच्या विरोधात शिवसेना कार्यकर्त्यांनी जोरादर घोषणाबाजी करण्यात आली. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांच्यावतीनं बंदोबस्त ठेवण्यात आला होता. राज्यात घडत असलेल्या घटना बघता पोलिसांनी तयारी करत बंदोबस्त ठेवला होता.
Latest Videos