'जरंडेश्वर कारखाना पुन्हा मूळ मालकाच्या ताब्यात घ्या', शालिनी पाटील यांच्याकडून हायकोर्टात याचिका, म्हणाल्या...

‘जरंडेश्वर कारखाना पुन्हा मूळ मालकाच्या ताब्यात घ्या’, शालिनी पाटील यांच्याकडून हायकोर्टात याचिका, म्हणाल्या…

| Updated on: Sep 07, 2023 | 11:43 AM

VIDEO | जरंडेश्वर कारखाना पुन्हा मूळ मालकाच्या ताब्यात घ्या, जरंडेश्वर कारखान्याचे संस्थापक शालिनी पाटील यांनी हायकार्टात याचिका दाखल केली, याचिकेत काय केला गंभीर आरोप? बघा व्हिडीओ

मुंबई, ७ सप्टेंबर २०२३ | जरंडेश्वर कारखाना पुन्हा मूळ मालकाच्या ताब्यात घ्या, अशी याचिका कारखान्याचे संस्थापक शालिनी पाटील यांनी हायकार्टात याचिका दाखल केली आहे. सध्या ईडीकडून या जरंडेश्वर कारखान्याचा तपास सुरू आहे. जरंडेश्वर कारखान्याचे मूल्य १०४ कोटी असताना फक्त ६४ कोटीमध्ये या कारखान्याचा लिलाव करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, जरंडेश्वर साखर कारखान्याच्या संदर्भात ईडीने स्वतः कारवाई केली होती आणि दोषारोप पत्र दाखल केलेले होते. त्या आरोपंच काय झालं? असा सवालही उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. तर अजित पवार आणि त्यांची टोळी भाजप सोबत गेली तर ते सगळे साफ झाले. शालिनी पाटील आत्ता यासंदर्भात लढा देत असतील तर आमचा त्याला पाठिंबा असल्याचे संजय राऊत म्हणाले.

Published on: Sep 07, 2023 11:43 AM