लोकसभेसाठी ‘त्या’ चार नावांची चर्चा, बावनकुळे म्हणतात, ‘कुठलाही निर्णय रस्त्यावर….’
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जळगावामधून उज्ज्वल निकम, पुण्यातून सुनील देवधर, मुंबईतून माधुरी दीक्षित तर धुळ्यातून प्रतापराव दिघावकर यांच्या नावाची चर्चा सुरु झालीय. यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी मोठे भाष्य केलंय.
अहमदनगर : 24 सप्टेंबर 2023 | केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यामुळे लोकसभेसाठी काही नावाच्या चर्चांना उधाण आलंय. मात्र, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत थेट भाष्य केलंय. भाजपमध्ये केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड आहे. तेथे चर्चा झाल्याशिवाय कोणताही निर्णय होत नाही. जे काही सुरु आहे त्या सर्व अफवा आहेत. असा कुठलाही निर्णय रस्त्यावर होत नाही. केंद्रीय पार्लमेंट बोर्ड जेव्हा निर्णय करेल तेव्हाच त्याला अंतिम समजावं असं बावनकुळे म्हणाले. आदित्य ठाकरे यांनी नागपूर येथील पूर परिस्थितीवरून काही बोलू नये. दोन तासात पडतो 110 मिलिमीटर पाऊस त्यावेळी जगातल्या कुठल्याही शहरात ही परिस्थिती निर्माण होते. देवेंद्र फडणीस आणि नितीन गडकरी यांच्यामुळे नागपूर बदलला आहे. पण आदित्य ठाकरे यांचे या शहरासाठी शून्य योगदान आहे. त्यांनी एक रुपयाही नागपूर शहरावर खर्च केला नाही. नागपूर आम्ही सांभाळतोय ज्याला मुंबई सांभाळता आली नाही त्यांनी इतर गोष्टी करू नये.