नागपुरात पहिल्यांदाच माणसांशी बोलणारं फुलपाखरू

नागपुरात पहिल्यांदाच माणसांशी बोलणारं फुलपाखरू

| Updated on: Jan 28, 2022 | 11:43 AM

माणसांशी बोलणारं फुलपाखरु (Talking Butterfly) आज आम्ही आपल्या भेटीला घेऊन आलोय. हे फुलपाखरु (butterfly) तुम्हाला चक्क आपलं नाव सांगते, आपल्या प्रजातीबद्दल आणि स्वताबद्दल सर्व माहिती सांगते.

माणसांशी बोलणारं फुलपाखरु (Talking Butterfly) आज आम्ही आपल्या भेटीला घेऊन आलोय. हे फुलपाखरु (butterfly) तुम्हाला चक्क आपलं नाव सांगते, आपल्या प्रजातीबद्दल आणि स्वताबद्दल सर्व माहिती सांगते. चक्क तुमचं नाव घेऊन तुमच्याशी संवाद साधते.  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर (Nagpur) विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभागातील हे बोलणारं फुलपाखराचा शोध लावला आहे. विद्यार्थ्यांना अनोख्या पद्धतीनं शिकता यावं, फुलपाखरांची माहिती कळावी, म्हणून डॅा. सारंग ढोके यांनी हे ॲप तयार केलंय. त्याची सुरुवात नागपूर विद्यापीठात करण्यात आलीय.  क्यु आर कोड स्कॅन करुन, ‘I am butterfly’ हे ॲप विद्यार्थ्यांना डाऊनलोड करता येतं. या ॲपमध्ये ५३ प्रकारच्या फुलपाखरांची माहिती संकलित करण्यात आलीय.