वेळीच गुंडांना आवर घाला… हर्षवर्धन पाटलांचं देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गाऱ्हाणं तरी काय?
बारामती जिंकण्यासाठी अजित पवार यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे. महायुतीचं बळ सोबतीला आहे पण बारामती लोकसभेत महायुतीच्या नात्यात ठिणग्या पडताय. काही दिवसांपूर्वी इंदापुरच्या अजित पवार यांच्या तालुका प्रमुखांनी हर्षवर्धन पाटलांना जाहीर सभेतून शिवीगाळ केली
मुंबई, ५ मार्च २०२४ : इंदापुरात महायुतीच्या धर्माची दाट कसोटी लागण्याची शक्यता आहे. कारण आता मतदारसंघात अजित गटाचे पदाधिकारी धमक्या देत असल्याची तक्रार हर्षवर्धन पाटील यांनी दवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. बारामती जिंकण्यासाठी अजित पवार यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे. महायुतीचं बळ सोबतीला आहे पण बारामती लोकसभेत महायुतीच्या नात्यात ठिणग्या पडताय. काही दिवसांपूर्वी इंदापुरच्या अजित पवार यांच्या तालुका प्रमुखांनी हर्षवर्धन पाटलांना जाहीर सभेतून शिवीगाळ केली. त्यावरून हर्षवर्धन पाटलांना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित गुंडांवर कारवाईची मागणी केली. देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात हर्षवर्धन पाटील यांनी असे म्हटले की, राज्यात महायुतीचं सरकार योग्य काम करतंय. पण इंदापुरात मित्रपक्षांचे सहकारी एकेरी उल्लेख करून मला शिवीगाळ करत आहेत. मतदारसंघात फिरू न देण्याची धमकी देत आहेत. मला माझ्या सुरक्षेची चिंता वाटत असल्याचेही त्यांनी यावेळी गृहमंत्र्यांना पत्राद्वारे कळवले आहे.