मोदींनी तीन महिने आराम केला नाही, दिवसरात्र…; चंद्राबाबू नायडूंकडून तोंडभरून कौतुक
भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीची दिल्लीत महत्त्वाची बैठक सुरु आहे. NDA मधील सर्व पक्षांचे खासदार या बैठकीला उपस्थित आहेत. एनडीए संसदीच्या पक्षाच्या नेतेपदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तेलगु देसम पार्टीचे चंद्राबाबू नायडू यांनी समर्थन दिल्याचे पाहायला मिळाले. बघा काय केलं कौतुक?
नरेंद्र मोदींनी गेले तीन महिने अजिबात आराम केला नाही. दिवस-रात्र त्याच उत्साहाने जोरदार प्रचार केसा. आंध्र प्रदेशात तीन जाहीर सभा घेतल्या, एक मोठी रॅली केली. त्यामुळे खूप मोठा फरक पडला आणि आंध्र प्रदेशात आम्ही जिंकलो. अनेक नेते आंध्र प्रदेशात आले केंद्र आपल्यासोबत आहे त्यामुळे हा आत्मविश्वास लोकांमध्ये आला आहे, असं वक्तव्य तेलगु देसम पार्टीचे चंद्राबाबू नायडू यांनी केले. भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीची दिल्लीत महत्त्वाची बैठक सुरु असून NDA मधील सर्व पक्षांचे खासदार या बैठकीला हजर आहेत. दरम्यान, यावेळी चंद्राबाबू नायडू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच तोंडभरून कौतुक केल्याचे पाहायला मिळाले. नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधान म्हणून तिसरा कार्यकाळ असणार आहे. नरेंद्र मोदींच्या रुपाने एनडीएकडे दूरदृष्टी असलेले नेत्यांचा पाठिंबा आहे. मागील गेल्या 40 वर्षांपासून मी राजकारणात सक्रिय असून अनेक नेते बघितलेत. आज भारत जागतिक शक्ती बनला आहे. आज जगात भारताचा डंका जगभरात वाजतोय, त्याच सर्व श्रेय मी मोदींना देतो, असं म्हणत त्यांनी मोदींचे अभिनंदन केले.