बॅनर फाडून कडवटपणा येतो, दीपक केसरकर यांचा विरोधकांवर हल्लाबोल

बॅनर फाडून कडवटपणा येतो, दीपक केसरकर यांचा विरोधकांवर हल्लाबोल

| Updated on: Feb 04, 2023 | 11:19 AM

'बॅनर फाडणे ही संस्कृती चुकीची, बॅनर फाडून कोण मोठं होत नाही किंवा कोणाला कमी करता येत नाही', केसरकर यांचा विरोधकांवर निशाणा

मुंबई : बॅनर फाडणे ही संस्कृती चुकीची आहे. हे बॅनर्स कोणी फाडले हे माहित नाही, त्यामुळे त्यावर भाष्य काय करणार… सिंधुदुर्गसारख्या शांतता प्रिय जिल्हातील कांदळ गावात ही सभा होत असेल आणि सभेचे बॅनर्स लावले असतील ते फाडून काय होणार, ती आपली संस्कृती नाही, त्यामुळे मी सर्वांना आवाहन करेल की अशा गोष्टी सिंधुदुर्ग जिल्ह्यात घडू नयेत यासाठी काळजी घ्यावी, असेही मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.

मुंबईतील दादर शिवाजी पार्क येथील आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतील शिवाजी पार्क आर्ट फेस्टिव्हलचे बॅनर्स कोणी फाडले माहित नाही, ते देखील अज्ञात व्यक्तींकडून फाडण्यात आले आहेत. मात्र बॅनर फाडून कोण मोठं होत नाही किंवा कोणाला कमी करता येत नाही. त्यातून केवळ कडवटपणा निर्माण होतो. राजकीय विरोधक असलो तरी आदित्य ठाकरे यांनी निर्माण केलेल्या प्रश्नांना मी उत्तर देईल, पण व्यक्तिगत पातळीवर कोणतीही टीका करणार नाही, असेही दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले आहे.

Published on: Feb 04, 2023 11:15 AM