Telangana Assembly Election 2023 : तेलंगणाची सत्ता कुणाच्या हाती? 3 कोटी मतदार करणार फैसला?

Telangana Assembly Election 2023 : तेलंगणाची सत्ता कुणाच्या हाती? 3 कोटी मतदार करणार फैसला?

| Updated on: Nov 24, 2023 | 5:56 PM

तेलंगणा राज्यातील विधानसभेच्या 119 जागांवर एकाच टप्प्यात मतदान, तर 30 नोव्हेंबर रोजी हे मतदान होणार असून 3 डिसेंबर रोजी निकाल लागणार आहेत. 119 विधानसभा मतदारसंघात 31 जागा राखीव असून त्यामध्ये 12 जागा एसटी आणि 19 जागा एससीसाठी राखीव

Telangana Assembly Election 2023 : तेलंगणा राज्यातील विधानसभेच्या 119 जागांवर एकाच टप्प्यात मतदान होणार असून 30 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर 3 डिसेंबर रोजी निकाल लागणार आहेत. 119 विधानसभा मतदारसंघात 31 जागा राखीव असून त्यामध्ये 12 जागा एसटी आणि 19 जागा एससीसाठी राखीव आहेत. तर 88 जागा खुल्या वर्गासाठी आहेत. राज्यातील 3 कोटी 17 हजार मतदार आपल्या राज्याची सत्ता कुणाच्या हाती असेल याचा फैसला करणार आहे. 1 कोटी 58 लाख 71 हजार 493 पुरुष मतदार आणि 1 कोटी 58 लाख 43 हजार महिला मतदार राज्याची सत्ता कुणाच्या हाती द्यायची याचा निर्णय घेणार आहेत. काँग्रेस आणि केसीआर यांच्या बीआरएसमध्येच राज्यात मुख्य लढत होत आहे तर भाजपचंही आव्हान राज्यात उभं राहण्याची शक्यता आहे. राज्यात बीआरएसची एमआयएमशी युती नसली तरी त्यांच्यात आतून साटंलोटं झालेलं आहे. तर या निवडणुकीत बसपाही पूर्ण ताकदीने निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे.

Published on: Nov 24, 2023 05:56 PM