'नारा नही निर्धार, अबकी बार किसान सरकार', नागपुरात 'या' पक्षाच्या बॅनरची होतेय चर्चा

‘नारा नही निर्धार, अबकी बार किसान सरकार’, नागपुरात ‘या’ पक्षाच्या बॅनरची होतेय चर्चा

| Updated on: Jun 11, 2023 | 8:30 AM

VIDEO | 'मेरा वोट मेरी सरकार, अबकी बार किसान सरकार' नागपुरात BRS चे बॅनर चर्चेत

नागपूर : तेलंगणाचे मुख्यमंत्री के सी राव यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षाची महाराष्ट्रात निवडणूक तयारी जोरात सुरू असल्याचे चित्र दिसतंय. याचेच नागपुरात मोठे होर्डिंग लावल्याचे पाहायला मिळत आहे. ‘मेरा वोट मेरी सरकार’ , ‘अबकी बार किसान सरकार’,’नारा नही निर्धार , अबकी बार किसान सरकार’, अशा आशयाचे शहरात ठिकठिकाणी होर्डिंग लागले आहेत. होर्डिंगच्या माध्यमातून तेलंगणाचे मुख्यमंत्री के सी राव यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षाची महाराष्ट्रात निवडणुकीची वातावरण निर्मिती करण्यात आली आहे. या होर्डिंगची नागपुरात जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, तेलंगणाचे मुख्यमंत्री एन चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षाने महाराष्ट्रात हातपाय पसरवण्यास सुरूवात केल्याचे काही दिवसांपासून दिसंतय. महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरील अनेक राजकीय नेत्यांनी एन चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षाने प्रवेश केला आहे.

Published on: Jun 11, 2023 08:06 AM