मुंबईकरांनो तब्येत सांभाळा… तापमानात होणार ‘इतकी’ वाढ अन् अवकाळीचीही शक्यता
VIDEO | यंदा मे महिन्यात मुंबईकरांना वाढत्या तापमानाला सामोरे जावे लागणार, किती असणार तापमान?
मुंबई : राज्यात चक्रवातविरोधी स्थिती निर्माण व्हायला सुरुवात झाली असून, मुंबईत तापमानाचा (Mumbai Climate) पारा चढण्याची शक्यता आहे. यंदा मे महिन्यात मुंबईकरांना चढ्या तापमानाला सामोरे जावे लागणार आहे, सध्याच्या चक्रवातविरोधी स्थितीमुळे मुंबईतील तापमानही ३७ ते ३८ अंशांदरम्यान पोहोचण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. चक्रवातविरोधी स्थिती निर्माण झाल्यावर या प्रणालीच्या आतले वारे बाहेरच्या दिशेने फेकले जातात. हे वारे जमिनीवरच्या हवेला वर येऊ देत नाहीत. ही हवा जागेवरच राहते, त्यामुळे तापमानामध्ये वाढ होते. मुंबईत आजपासून हळूहळू तापमानवाढ दिसण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईत हवेतील आद्रताही ८० टक्के ऐवढी वाढलीये. त्यामुळे ढगाळ वातावरणासहीत अवकाळी पावसाचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. अवकाळी पावसामुळं शेतीचं नुकसान झालंय तर अनेकांना आरोग्याच्या समस्या जाणवू लागल्यायत, वैज्ञानिकांनी बदलत्या हवामानाबाबत चिंता व्यक्त केली आहे.