'राज्यातील तापमानात आणखी वाढ होणार'

‘राज्यातील तापमानात आणखी वाढ होणार’

| Updated on: Mar 29, 2022 | 12:49 PM

नागपूरसह विदर्भात तापमानात वाढ झाली आहे. येत्या दोन दिवसांत विदर्भात उष्णतेची लाट (Heat wave in Vidarbha) येण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.

नागपूरसह विदर्भात तापमानात वाढ झाली आहे. येत्या दोन दिवसांत विदर्भात उष्णतेची लाट (Heat wave in Vidarbha) येण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. याविषयी हवामान खात्याचे रामचंद्र साबळे म्हणाले, “सूर्याचं उत्तरायण सुरू आहे. 22 मार्चला सूर्य विषुववृत्तीयच्या कक्षेमध्ये असतो. त्यानंतर उत्तरायणच्या दिशेनं १२ तासांचा दिवस १२ तासांची रात्र असं न होता, दिवसाचे तास वाढतात. जितके तास वाढतात, तेवढा सूर्यप्रकाश मिळतो. सरळ किरणं येत असल्याने तापमान वाढतो.”