अमरावतीतून दहा किलो सोने जप्त

अमरावतीतून दहा किलो सोने जप्त

| Updated on: Mar 06, 2022 | 10:14 PM

अमरावती शहरातल्या दसरा मैदान परिसरातील राधाकृष्ण अपार्टमेंटमध्ये असलेल्या एका फ्लॅटवर पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात पोलिसांनी तब्बल दहा किलो सोने जप्त केले आहे. या जप्त केलेल्या सोन्याची किंमत अदाजे पाच कोटी रुपये असल्याची माहिती समोर येत आहे.

अमरावती : राजापेठ पोलिसांनी (Rajapeth Police) दिलेल्या माहितीनुसार अमरावती शहरातील दसरा मैदान परिसरातील राधाकृष्ण अपार्टमेंट (Dussehra Maidan Radhakrishna Apartment) आहे. या अपार्टमेंटच्या फ्लॅट क्रमांक 401 मध्य काही व्यक्ती संशयास्पद असल्याची गुप्त माहिती मध्यरात्रीच पोलिसांना मिळाली. त्याआधारे राजापेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे (Police Inspector Manish Thackeray) व त्यांचे पथक व्हिडीओ कॅमेरा घेऊन या अपार्टमेंटमध्ये दाखल झाले. यावेळी त्या फ्लॅटमध्ये राजेंद्र सिंगसह अन्य दोन व्यक्ती राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या व्यक्तींकडे बरेच व्यवहाराचे कागदपत्र देखील होते. असंही पोलीस निरीक्षक ठाकरे यांनी सांगितलं. हे आरोपी सोने व्यापाऱ्यांच्या संपर्कात होतो अशी माहिती समोर आली आहे. या कारवाई दरम्यान दहा किलोपेक्षा जास्त सोन्याचे दागिने सापडले. या सोन्याची किंमत पाच कोटी इतकी आहे. शिवाय पाच लाख रुपये रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली. या प्रकरणाची संपूर्ण माहिती पोलिसांनी आयटी विभागालाही दिली आहे.