Kolhapur | कोल्हापुरातील मेघोली तलाव पुनर्बांधणीसाठी निविदा निघणार

Kolhapur | कोल्हापुरातील मेघोली तलाव पुनर्बांधणीसाठी निविदा निघणार

| Updated on: Sep 18, 2021 | 9:14 AM

कोल्हापुरातील मेघोली तलाव पुनर्बांधणीसाठी तीन महिन्यात निविदा निघणार आहेत. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी शिष्टमंडळाला याबाबतची माहिती दिली. महिन्याभरापूर्वी भुदरगड तालुक्यातील मेघोली तलाव फुटल्याने हजारो हेक्टर शेतीचे नुकसान झालंय. तलाव फुटल्याने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली.

कोल्हापुरातील मेघोली तलाव पुनर्बांधणीसाठी तीन महिन्यात निविदा निघणार आहेत. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी शिष्टमंडळाला याबाबतची माहिती दिली. महिन्याभरापूर्वी भुदरगड तालुक्यातील मेघोली तलाव फुटल्याने हजारो हेक्टर शेतीचे नुकसान झालंय. तलाव फुटल्याने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पीक कर्जाला मुदतवाढ मिळणार आहे. तर वाहून गेलेल्या विहिरींची खुदाई रोजगार हमी योजनेतून करण्याच्या हालचाली होत आहेत.