संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीत तणाव?
संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि बंडखोर शिवसेना आमदारांना दिलेली नवी ऑफर ही महाविकास आघाडीसाठी तणाव वाढवणारी ठरली आहे.
संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि बंडखोर शिवसेना आमदारांना दिलेली नवी ऑफर ही महाविकास आघाडीसाठी तणाव वाढवणारी ठरली आहे. शिवसेना आमदारांचा आग्रह असेल तर महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत स्थापन केलेल्या महाविकास आघाडीतून बाहेरही पडण्याची आमची तयारी आहे. फक्त आमदारांनी पुढील 24 तासांत मुंबईत यावं आणि इथे येऊन चर्चा करावी, असं राऊत म्हणाले. यानंतर काँग्रेसने आपली भूमिका ठरविण्यासाठी सह्याद्रीवर बैठक बोलावली आहे. राऊतांच्या वक्तव्यावर काँग्रेस नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे. तर दुसरीकडे वाय. बी. चव्हाण सेंटरला राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक सुरू आहे.
Published on: Jun 23, 2022 04:07 PM
Latest Videos