Jammu and kashmir मध्ये पोलिसांच्या बसवर दहशतवाद्यांचा हल्ला, 3 पोलीस शहीद, 3 जणांची प्रकृती गंभीर
जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये सशस्त्र पोलिसांच्या 9व्या बटालियनवर अतिरेक्यांनी बेछुट गोळीबार केला आहे. अतिरेक्यांनी केलेल्या या अंदाधुंद गोळीबारात 3 पोलीस शहीद झाले असून 12 पोलीस जखमी झाले आहेत.
श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये सशस्त्र पोलिसांच्या 9व्या बटालियनवर अतिरेक्यांनी बेछुट गोळीबार केला आहे. अतिरेक्यांनी केलेल्या या अंदाधुंद गोळीबारात 3 पोलीस शहीद झाले असून 12 पोलीस जखमी झाले आहेत. या सर्व जखमी पोलिसांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात येत आहेत.
श्रीनगरच्या पंथचौक परिसरात पोलिसांच्या बसवर अतिरेक्यांनी अचानक हल्ला केला. या हल्ल्यानंतर पोलिसांनीही त्यांना प्रत्युत्तर दिले. मात्र, पोलिसांचं उलट प्रत्युत्तर सुरू होताच अतिरेक्यांनी या परिसरातून पलायन केलं. या हल्ल्यात 2 पोलीस शहीद झाले असून 12 पोलीस जखमी झाले आहेत. या सर्व जखमी पोलिसांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात येत आहेत.
Published on: Dec 13, 2021 07:39 PM
Latest Videos