अहमदनगरमध्ये तृतीयपंथी महिलांच्या हस्ते ‘श्री’ ची आरती

| Updated on: Sep 04, 2022 | 11:30 AM

नेता सुभाष तरुण मंडळाकडून तृत्तीय पंथी महिलांना आर्थिक साहाय्य म्हणून त्यांना मदत करण्यात आली. नेता सुभाष तरुण मंडळाने या अशा स्तुत्य कार्यक्रमाचे आयोजन केल्याने परिसरातून कौतूक होत आहे. 

गणेशोत्सवानिमित्ताने राज्यात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, त्याचप्रमाणे अहमनगरमधील नेता सुभाष तरुण मंडळानेही स्तुत्य उपक्रमाचे आयोजन केले होते. अहमदनगरमधील तृत्तीय पंथीय महिलांकडून यावेळी गणेशाचा आरती करण्यात आली. श्रीच्या आरतीचा मान तृत्तीय पंथी महिलांना मिळाल्याने या महिलांनी आनंद व्यक्त केला. गणेशाची आरती झाल्यानंतर यावेळी पुस्तक प्रकाशनाचाही कार्यक्रम मोठ्या दिमाखात पार पडला. यावेळी नेता सुभाष तरुण मंडळाकडून तृत्तीय पंथी महिलांना आर्थिक साहाय्य म्हणून त्यांना मदत करण्यात आली. नेता सुभाष तरुण मंडळाने या अशा स्तुत्य कार्यक्रमाचे आयोजन केल्याने परिसरातून कौतूक होत आहे.

Published on: Sep 04, 2022 10:00 AM
मुंबईत पहाटेपासून पावसाची जोरदार बॅटींग…
Video: 50 खोके घेऊन सगळं ओके करून ओरबाडून लाल दिवा आणला- सुप्रिया सुळे