उद्धव ठाकरे यांच्या बारसू दौऱ्याचं दीपक केसरकर यांनी थेट सांगितलं कारण; म्हणाले, ‘विकासात अडथळा…’
VIDEO | उद्धव ठाकरे यांच्या बारसू दौऱ्यावर मंत्री दीपक केसरकर यांचं टिकास्त्र, काय म्हणाले बघा...
कोल्हापूर : उद्धव ठाकरे यांच्या बारसू दौऱ्याचे मंत्री दीपक केसरकर यांनी थेट कारण सांगत जोरदार हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे बारसूमध्ये येऊन विकासामध्ये अडथळा निर्माण करण्यासाठी आले आहेत आणि त्या ठिकाणी जाऊन आंदोलकांशी चर्चा केली आणि मागण्या सांगितल्या तर विरोधासाठी विरोध होणार नाही. ज्या योग्य मागण्या असतील त्याचाच विचार करण्यात येईल, असे मंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या बारसू दौऱ्यावर म्हटले आहे. तर उद्धव ठाकरे यांनी रिफायनरी बारसू येथे व्हावे हे पत्र देवून सुचवलं होतं. महाराष्ट्रातील इतिहासात पहिल्यांदाच स्वतः पत्र देऊन स्वतः विरोध करणे होत आहे म्हणूनच त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल शरद पवारांनी आत्मचरित्रामध्ये व्यवस्थित लिहिलं आहे, त्यामुळे त्यावर मी अधिक बोलणं गरजेचं नाही. तुम्ही आत्मचरित्र वाचा म्हणजे तुम्हाला त्यांची कार्यपद्धती कळेल शरद पवार यांनी लिहिल्याप्रमाणे मुख्यमंत्रीपद हे उद्धव ठाकरे यांनी स्वीकारायला नव्हतं पाहिजे होतं आणि स्वीकारलं होतं तर त्याला न्याय देणं गरजेचं होतं. ते आज सुद्धा पदाला न्याय देऊ शकतात. त्यांनी पत्र लिहिल्याप्रमाणे मुलांच्या रोजगारासाठी माजी मुख्यमंत्र्यांनी न्याय देणे गरजेचे आहे, असे म्हणत केसरकर यांनी उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे.