संभाजीनगरमध्ये ठाकरे गटात टक्कर, कोणाला मिळणार तिकीट? खैरे आणि दानवे आमने-सामने
लोकसभा लढवण्यासाठी अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे हे दोघेही इच्छुक.... दानवे यांनी खैरे यांच्यावर डावलल्याचा आरोप केलाय. शुक्रवारी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत दानवे आणि खैरे यांची बैठक झाली. मात्र अद्याप तिकीटावर शिक्कामोर्तब झालेलं नाही.
मुंबई, १७ मार्च २०२४ : छत्रपती संभाजीनगरमध्ये लोकसभेच्या उमेदवारीवरून ठाकरे गटातील दोन दिग्गज आमने-सामने आलेत. लोकसभा लढवण्यासाठी अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे हे दोघेही इच्छुक आहेत. दानवे यांनी खैरे यांच्यावर डावलल्याचा आरोप केलाय. शुक्रवारी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत दानवे आणि खैरे यांची बैठक झाली. मात्र अद्याप तिकीटावर शिक्कामोर्तब झालेलं नाही. दरम्यान, अंबादास दानवे माझा शिष्यच आहे आणि गुरू काहीतरी हातचं राखून ठेवतो, असे खैरे म्हणाले मात्र अंबादास दानवे यांनी खैरे यांना गुरू मानन्यास तयार नाही. यावेळी चंद्रकांत खैरे यांनी त्यांच्या लोकसभा उमेदवारीवर देखील भाष्य केले आहे. चंद्रकांत खैरे म्हणाले, ‘बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, तुझ्या नशिबात असेल तर मला द्यावं लागेल माझ्या नशिबात नसले तर नाही, माझ्या नशिबात मागच्या वेळेचे लोकसभा निवडणूक होती पण त्यावेळी डावपेचानं मला दूर करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले. तर एकनाथ शिंदे यांच्या गटाने सस्पेन्स वाढवलाय. सोमवारपर्यंत आमचाही छत्रपती संभाजीनगरमधील उमेदवार जाहीर होईल, असं संजय शिरसाट म्हणाले…त्यामुळे आता नेमके कोणते उमेदवार लोकसभा लढणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.