मुंबईत इंडियाचं मंथन तर भाजपची बारामतीवर नजर, अजित पवार करणार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात प्रचार?
VIDEO | मुंबईत विरोधकांच्या इंडियाच्या बैठकीची तयारी पूर्ण तर इंडियाच्या बैठकीआधीच उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याकडून १८ जागांचा दावा तर भाजपची विशेष रणनिती नेमकी काय असणार?
मुंबई, २९ ऑगस्ट २०२३ | मुंबईत विरोधकांच्या इंडियाच्या बैठकीची तयारी पूर्ण आहे. त्यापूर्वी ठाकरे गटाकडून लोकसभेसाठी १८ जागांवर दावा केला जातोय, तर भाजपनं २०१९ मध्ये पराभव झालेल्या १६० जागांसाठी खास रणनिती आखली आहे. त्यामध्ये बारामतीचाही समावेश आहे. महाराष्ट्रात ठाकरे गट लोकसभेच्या १८ जागा लढणार, त्याच्या १५ जागा सुद्धा होणार नाही. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी उद्धव ठाकरे भाजपसोबत होते. युतीमध्ये लढताना भाजपचे २३ खासदार तर शिवसेनेचे १८ खासदार निवडून आलेत. मात्र शिंदे यांच्या बंडानंतर १३ खासदार निवडून आलेत. तर ५ खासदार ठाकरे गटाकडे गेले. असं असले तरी २०१९ च्या विजयी आकड्यांएवढ्या जागा आम्ही लढणार असा पवित्रा ठाकरे यांच्या शिवसेनेचा आहे. तर मुंबईत मुंबईत विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या बैठकीत जागा वाटपावर चर्चा होणार असल्याची माहिती आहे. इंडियाच्या बैठकीत काय होणार? बघा स्पेशल रिपोर्ट