तीन महिन्यात तिसरा दौरा, अमरावतीतून सुषमा अंधारे निवडणूक लढणार? काय म्हणाल्या स्वतः सुषमा अंधारे?
VIDEO | खासदार नवनीत राणा आणि सुषमा अंधारे हा वाद कायम आहे. अशातच तीन महिन्यात तिसरी सभा होतेय. अमरावतीतून सुषमा अंधारे निवडणूक लढणार? स्वतः सुषमा अंधारे म्हणाल्या, 'अमरावतीमध्ये पोषक वातावरण आहे म्हणून...'
अमरावती, १५ ऑगस्ट २०२३ | अमरावतीतून सुषमा अंधारे निवडणूक लढणार? अशा चर्चा सध्या होताना दिसताय, अशातच अमरावतीमध्ये गेल्या तीन महिन्यात तिसरा दौरा सुषमा अंधारे अमरावतीचा करताय. याबाबत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी स्वतः भाष्य केल आहे. त्या म्हणाल्या, कोणीतरी चुकीच्या बातम्या दिल्या की मी अमरावती लोकसभा निवडणूक लढणार आहे. पण मी अमरावतीत निवडणूक लढणार नाही. अमरावतीमध्ये आम्हाला पोषक वातावरण आहे. म्हणून मी अमरावतीचा दौरा करत आहे बाकी उमेदवार कोण असेल ते नंतर बघूया. आम्ही अमरावतीमध्ये फार जातीन लक्ष घालतोय. तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने अमरावतीमध्ये पक्ष बांधणीचं काम सुरू असल्याचे सुषमा अंधारे यांनी म्हटले. खासदार नवनीत राणा आणि सुषमा अंधारे हा वाद कायम आहे. अशातच तीन महिन्यात तिसरी सभा होतेय. यावर प्रश्न विचारला असता सुषमा अंधारे म्हणाल्या, नवनीत राणा या हनुमान चालीसेच्या जास्त प्रेमात पडलेल्या आहे. आम्ही फक्त त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतोय की हनुमान चालीसा किंवा कुठलाही ग्रंथ, श्लोक, अभंग कुरान ते पाठ असणे म्हणजे खासदार असण्याचे शिक्षण असू शकत नाही. खासदार होण्यासाठी आणि लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी तिथल्या जनमानसाचे प्रश्न माहीत असणे गरजेचे आहे.